Skip to main content

ब्रम्हांड नायक

स्वामी(Monologue )

               अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज ह्यांच्या कृपेने ही कृती स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित.

Chalisa

             हे मार्गदर्शन नाही, उपदेश नाही , स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी विविध माहिती एकत्रित करून एकाच ठिकाणी देण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. १८७८ पर्यंत स्वामी प्रत्यक्ष रूपाने अक्कलकोट येथे वास्तव्यास होते, कुठलीही प्रवच नाहीत, प्रचार नाही आलेल्या प्रत्यके जीवाचे महाराजांनी त्याच पूर्वसंचीत प्रारब्ध क्रीयामाण इत्यादी गोष्टींचा लेखाजोखा , मागोवा न घेता त्याचे पूर्णत: सर्वेपरी कल्याण केले, हे करत असताना त्यांनी कोणालाही वारंवार अक्कलकोट येथे खेटे घालायला , चकरा मारायला लावले नाहे. प्रत्यक्ष रूपाने कार्य करत असताना, गुप्त किंवा अप्रत्यक्ष रूपाने स्वामींचे कार्य हे एकाच वेळेस अनेक ठिकाणी चाललेलं त्या काळात भक्तांनी बघितल.

              स्वामी महाराज नक्की कोण होते, स्वामी समजवून घेण्याचा प्रयत्न करणे इ० भानगडीत न पडता स्वामींची कृपा संपादन करणे व त्यायोगे भौतिक व अध्यात्मिक जीवन व पारलौकिक जीवन सुख समृद्धी व समाधानात जगणे ह्या करता हा सगळा प्रयत्न आहे

              स्वामी महाराजांच्या ह्या मार्गात कुठल्याही प्रकारची दीक्षा नाही,मंत्रदीक्षा ,तंत्र दीक्षा नाही, गुरुदीक्षा नाही इ० नाही, इतर वेगेळे कोणी असे गुरु नाहीत. स्वामी हेच जो सेवा करतो त्याचे गुरु आहेत हे समजवून देण्याचा प्रयत्न आहे.

              स्वामी समर्थ महाराजां च्या सेवेने दुसऱ्या ने दुष्ट बुद्धीने केले मंत्र यंत्र तंत्र प्रयोग ह्यांचे हल्ले समूळ नष्ट होतात, जारण,मारण, उच्चाटन ,चेटूक, भानामती, पिशाच आदी च्या मदतीने केलेले हल्ले मुळा पासून नष्ट होतात व ह्या मुळे उध्वस्थ झालेल्या जीवाचे आयुष पुनः मार्गी लागून तो जीव सर्वोपरी सुखी होतो, कारणी, पिशाच बाधा ,समंध बाधा , दृष्ट, भीती, नैराश्य,उद्विग्नता, सतत येणाऱ्या अडचणी, विनाकारण गैरसमज होऊन येणाऱ्या अडचणी, वारंवार येणारी आजारपण ,दारिद्र्य , गरिबी ग्रह बाधा, पत्रिकेतील अशुभ योग, चुकीच्या पत्रिका,हीन दर्जाची पत्रिका असणे, ग्रहदोष, वस्तुशल्य, वास्तुतील दोष, व्यसने, लग्न न जमणे, जमल तर मोडणे, घटस्पोत होणे , संतती न होणे, दर्गे, समाधी आदी मुळे होणारे त्रास , दैवतांचे प्रकोप, कुलदेवतेचे कोप ह्या सर्वांवर स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेने मात करून आपल जीवन अगदी अल्पावधीत च चिंतामुक्त, सुखी , समृद्ध करता येत.

                     काळ बदलत चालेलला आहे, समजात भोंदू बाबा,बुवा, साधू , बैरागी, भोंदू ज्योतिषी, याज्ञिक , तांत्रिक मांत्रिक ह्याचं प्रस्थ वाढत चाललेले आहे, अडचणीत सापडलेली व्यक्ती अश्या कोणाच्या संपर्कात आली तर तिची अजूनच दुरवस्था होते, जागोजागी कुंडलिनी जागृत करून देणारे आहेत, कोणी चक्र जागृत करतात तर कोणी पूर्वजन्म सांगतात ( past life regression ), कोणी खोटी अनुष्टान करतात तर काही दैनंदिन जीवनातील समस्या वर मार्गदर्शन करावयाचे सोडून मोक्ष मुक्ती ब्रम्ह ह्यावर प्रवचन देत जीवन नैराश्याने अजून भरून टाकतात, जागो जागी गुरु दीक्षा द्यायला तयार आहेत,फुकट ,तर कोणी पैसे घेऊन दीक्षा देतो आहे विशेष म्हणजे ह्याला बळी पडणारे पण दुर्दैवी लोक आहेत, हे सगळ फार भयानक आहे, अश्या प्रकार मुळे सर्वसामान्य जीवांचा देवावरील विश्वास उडतो ,समाजातील नास्तिकता अजून वाढत जाते.

                  अजून हि वेळ गेलेली नाही, वेळेच महत्व वेळेवर ओळखायला हव , वेळेवर आपण प्रयोग करू शकत नाही, भूतकाळातील चुका सुधारता येत नाही , भविष्यकाल माहिती नसतो, digital age मुळे  twitter, Facebook, what sup, INSTAGRAM ह्या वर विविध group, वैयक्तिक अध्यात्मिक पोस्ट फिरत असतात each vertical of Social Media has become a University for each and every subject. बऱ्याच वेळेस त्यातल्या काही पोस्ट ह्या दिशाभूल करणाऱ्या असतात,स्तोत्रे मंत्र तंत्र इ० कधी कधी चुकीचे typing झालेले असते,पोस्ट forward होताना त्यात नवीन भर पडत राहते, मनानेच काही गोष्टी त्यात जोडल्या जातात , अश्या काही चुकीच्या पोस्ट नाबळी पडून माणस पैसा वेळ वाया घालवून बसतात पदरात काही पडत नाही. 

           हल्ली तर कलियुग संपत आल आहे , जगाचा अंत जवळ आला आहे ,पृथ्वीचा विनाश अटळ आहे, येत्या २-३ वर्षात पृथ्वीवर प्रलय ???? जागाच अन्त इत्यादी भणंग पोस्ट फिरताना दिसतात, तथाकाधित काही विविध आचार्य,ज्योतिषी, TV channels, multimedia streaming videos,blogs websites  हे तारखा सांगत आहेत,रोजच meaningless भविष्य सांगत आहेत आणि ह्याचा सगळ्यात जास्त परिणाम अगदी लहान पासून वृद्धा वर होत आहे, अद्वैत तत्वज्ञाने सगळ्या जगाला उजळून टाकणाऱ्या व दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शन करणारा भारत आज स्वत:च ह्या विचित्र चक्र व्युहात फसलेला दिसतो हे अत्यंत निराशाजनक चित्र सगळीकडे दिसते.  

                       त्या मुळे नक्की काय करायचं हा प्रश्न पडतो, नैराश्य , depression , frustration , divorce irritation, lost of faith, suicide हे हाली common झाल आहे. ह्यातून बाहेर पडण्यासाठी स्वामी महाराजान सारख दैवत नाही.

        ज्यांना अडचणी असतील त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मठात, केंद्रात किंवा योग्य अधिकारी व्यक्ती कडे जाऊन योग्य मार्ग दर्शन घ्यावे व सुखी व्हावे, कृपया मला फोन करून आपल्या अडचणी सांगू नये  हि नम्र विनंती. 

          आधी विश्वास नसला तरी ठेवावा लागतो , स्वामी महाराजांची सेवा करावी लागते ,मग अनुभूती येतेच. आधी अनुभव आल्याशिवाय मी सेवा करणार नाही हि समजूत किंवा धारणा बर्याच लोकांची असते ती चुकीची आहे

            आधी University ने मला Graduation ची Degree दिल्यावरच मी college ला admission घेतो म्हणण्या सारखा हा प्रकार होईल

             परत एकदा मी इतकच म्हणेन हे मार्गदर्शन नाही , उपदेश नाही , हि माहिती मी share केली आहे, मी प्रश्न उत्तर करत नाही कृपया त्या करता फोन करू नये, इतर तुमच्या अध्यात्मा विषयी शंका असतील तर मला जे समजले आहे ते मी नक्की आपल्या बरोबर share करीनच

संजीव <!

Popular posts from this blog

श्री हनुमद प्रश्नावली चक्र

श्री हनुमद प्रश्नावली  भारतीय प्राचीन अध्यात्मिक ग्रंथात विविध प्रकारच्या उपाय योजना आढळतात त्या पैकी एक हनुमद प्रश्नावली, ह्या प्रश्नावली खालील प्रश्नांची उत्तर नक्कीच मिळतील ह्या व्यतिरिक्त इतर प्रश्नाची उत्तर मात्र आलेल्या उत्तराच्या आत लपलेलं असेल तारतम्य भावाने त्याचा अर्थ लावावा श्री हनुमान प्रश्नावली चक्र  १) मी हाती घेतलेले काम होईल ना ?  २) नवीन व्यवसाय धंदा करू कि नको ?  ३) हाती घेतलेल्या कामा पूर्ण होत नाही आहे काय करावे ?  ४) माझ्या कामात अडचणी येत आहेत काय करावे ? ५) भाग्योदय होण्यास काय करावे ?  ६) धनलाभाचे योग आहेत का ?  ७) माझा विचार बरोबर आहे का ?  ८) पैसे संबंधी चिंते वर काय करावे ?  ९) नौकरी / व्यवसाय अडचणीत काय करावे ?   ०१   ४३   ३२   २१   ३५   १२   ०४ २३ १५ ४८ ०९ ३० २२ ४९ ४२ ०६ ३८ ४१ १९ ३६ २० ४७ १३ ३७ 0८ ३१ ०३ ४५ २५ २४ १६ २९ ३४ ३३ २६ ४० १४ ४६ १० २७ ०५ १७ ०७ ४४ ३९ २८ १८ ११ ०२ ...

वैयक्तिक प्रश्न व त्यावरील मार्गदर्शन

Shri Swami Samartha अनुक्रमणिक शुभ व अशुभ ग्रह राशींची नावे मराठी व इंग्रजीत राशी व संभाव्य रोगांची शक्यता राशी व त्याचे ग्रह स्वामी राशी ग्रह रंग व रत्ने अनुक्रमणिका शुभ व अशुभ ग्रह व त्यांची तीव्रता शुभ ग्रह :- चंद्रमा ,बुध शुक्र और गुरु ,ये क्रम से अधिकाधिक शुभ माने गए है। अर्थात चंद्रमा से बुध , बुध से शुक्र और शुक्र से गुरु अधिक शुभ है। अशुभ ग्रह सूर्य , मंगल, शनि और राहू ये क्रम से अधिकाधिक पापी ग्रह है अर्थात सूर्य से मंगल, मंगल से शनि और शनि से राहू अधिक पापी है। अनुक्रमणिका राशींची नावे मेष Aries वृषभ Taurus मिथुन Gemini कर्क Cancer सिँह Leo कन्या Virgo तुला Libra वृश्चिक Scorpius धनु Sagittarius मकर Capricornus कुंभ Aquarius मीन Pisces अनुक्रमणिका राशी नुसार होणाऱ्या रोगांची शक्यता मेष Aries: नेत्ररोग, मुख रोग, सिरदर्द, मानसिक तनाव तथा अनिद्रा। वृषभ Taurus: गले एवं श्वास नली के रोग, आंख, नाक एवं गले के रोग। मिथुन Gemini: रक्तविकार, श्वास, फुफ्फुस रोग। कर्क Cancer: हृदयरोग तथा रक्तविकार। सिँह Leo:...